बुधवार दि. 06 एप्रिल 2022 वेळ :- सकाळी 10.00 वा.
स्थळ :- शेतकरी संकुल, बसस्थानकासमोर, बाजारभोगाव, कोल्हापूर.
उपस्थिती :- गोकुळ चे मा. चेअरमन आदरणीय अरुण नरके , गोकुळ संचालक श्री चेतन नरके, मा. संचालक श्री विश्वासराव जाधव, युथ बँक संचालक श्री दगडू टोपकार, सरपंच माया नितीन पाटील, डॉ. नाना पाटील, श्री. दादा पाटील, श्री. जयसिंग हिर्डेकर, श्री. प्रकाश मोरे, तसेच पन्हाळा तालुक्यातील मान्यवर इ.
अरुण नरके फौंडेशन ग्रामीणभागातील प्रत्येक हाताला काम हा संकल्प घेऊन तरुण बेरोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु करत आहे. या माधमातून उच्चशिक्षित अथवा अल्पशिक्षित तरुण किवा तरुणीमधील सृजनशीलता आणि कौशल्याला वाव देणारा रोजगार मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी महाराष्ट्रासह शेजारी राज्यातील विविध उधोग आणि व्यापारी संस्थांसोबत संस्थेने करार केला आहे. उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरूण तरूणींना त्यासंबंधी सर्व प्रकारचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचसोबत व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, मुलाखत तंत्र असे आणि इतर रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणारे शिक्षण आणि प्रशिक्षण देखील याठिकाणी मिळणार आहे.