अरुण नरके फौंडेशनमार्फत बाजारभोगाव येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु

बुधवार दि. 06 एप्रिल 2022      वेळ :-  सकाळी 10.00 वा.

स्थळ :- शेतकरी संकुल, बसस्थानकासमोर, बाजारभोगाव, कोल्हापूर.

उपस्थिती :- गोकुळ चे मा. चेअरमन आदरणीय अरुण नरके , गोकुळ संचालक श्री चेतन नरके, मा. संचालक श्री विश्वासराव जाधव, युथ बँक संचालक श्री दगडू टोपकार, सरपंच माया नितीन पाटील, डॉ. नाना पाटील, श्री. दादा पाटील, श्री. जयसिंग हिर्डेकर, श्री. प्रकाश मोरे, तसेच पन्हाळा तालुक्यातील मान्यवर इ.     

         अरुण नरके फौंडेशन ग्रामीणभागातील प्रत्येक हाताला काम हा संकल्प घेऊन तरुण बेरोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु करत आहे. या माधमातून उच्चशिक्षित अथवा अल्पशिक्षित  तरुण किवा तरुणीमधील सृजनशीलता आणि कौशल्याला वाव देणारा रोजगार मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी महाराष्ट्रासह  शेजारी राज्यातील विविध उधोग आणि व्यापारी संस्थांसोबत संस्थेने करार केला आहे. उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरूण तरूणींना त्यासंबंधी सर्व प्रकारचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचसोबत व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, मुलाखत तंत्र असे आणि इतर रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणारे शिक्षण आणि प्रशिक्षण देखील याठिकाणी मिळणार आहे.

Read More

चेतन नरके उडान-डेअर टू ड्रीम पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी):  गोकुळचे संचालक चेतन नरके यांना झी मिडियाच्या उडान-डेअर टू ड्रीम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चेतन नरके यांचे ३५ ए च्या निर्बंधामधून युथ बँक बाहेर येण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, गोकुळ संचालक म्हणून जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न, ग्रामीण भागातील सहकारातील संस्थांची वाढ आणि विकासाकरिताचा त्यांचा सहभाग आणि परदेशातील कॉर्पोरेट कंपन्यांमधील अनुभवाचा सहकार वाढीसाठी सुरु केलेला वापर याविषयावरील एक फिल्म यावेळी दाखवण्यात आली. यावेळी आयोजित परिसंवादात चेतन नरके यांनी भविष्यकाळात सहकार क्षेत्रातील संधी आणि अपेक्षित बदल यावर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी ना.अशोक चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेते अरुण नलावडे, अभिनेत्री श्रेया बुगडे, झी २४ तास चे संपादक निलेश खरे, कंट्री हेड मिनी हॅरीसन, झी मिडिया कोर्पोरेशन चे अधिकारी, पत्रकार, तसेच कृषी, सहकार, बँकिंग, उद्योग, बांधकाम, सामाजिक यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुढील आठवड्यात या संपूर्ण कार्यक्रमाचे झी २४ तास या वृत्त वाहिनीवरून प्रसारण होणार आहे.

Read More

तिसंगी ता.गगनबावडा येथे व्यवसाय मार्गदर्शन

अरुण नरके फौंडेशनच्या वतीने तिसंगी ता.गगनबावडा येथे आज दि. 17/06/22 रोजी  आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व लघुउद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना मा.चेतन नरके सर तसेच एमपीएससी व बँकिंग स्पर्धापरीक्षा विषयक मार्गदर्शन करताना प्रा. शिवकुमार पोवार सर…

Read More

पन्हाळा तालुक्यातील महिला बचत गटांना मार्गदर्शन

पन्हाळा तालुक्यातील महिला बचत गटांना व्यवसायातील नवनवीन संधी विषयक मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अरुण नरके फाऊंडेशन आणि युथ बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पडळ फाटा येथील श्री कृष्ण हॉल येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सेवा क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या व्यवसायिक संधींचा लाभ घ्यावा – चेतन नरके

पन्हाळा तालुक्यातील महिला बचत गटांना व्यवसायातील नवनवीन संधी विषयक मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अरुण नरके फाऊंडेशन आणि युथ बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पडळ फाटा येथील श्री कृष्ण हॉल येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युथ बँक आणि गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन अरुण नरके यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात त्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी बचतगटातील जवळपास अडीचशे भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Read More

अरुण नरके फौंडेशन व शिवराज विद्या संकुल यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सामजस्य करार

दि. ०१ मे २०२२

उपस्थिती :-  अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके, श्री प्रकाश शिंदे, श्री. शशिकांत सुतार, श्री. रमेश कांबळे, सौ. गौरी देशपांडे, सौ. सपना खाडे, किरण कांबळे, अर्जुन धनवडे, तसेच शिवराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, डॉ. मुंज, प्रा. विश्वजित कुराडे, बसवराज आजरी इत्यादी

अरुण नरके फौंडेशन व शिवराज विद्या संकुल यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सामजस्य करार झाला. यावेळी शिवराज विद्या संकुल व अरूण नरके फौंडेशनतर्फे सानेगुरूजी सेवकांच्या पतसंस्था इमारतीत सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन गोकुळ चे संचालक व फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. चेतन  नरके यांच्या हस्ते झाले.             ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षा माध्यमातून यश मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळावे म्हणून शिवराजने फौंडेशनशी करार करून स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरूवात केली आहे. यातून विद्यार्थ्यानी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करावे. असे अरूण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके म्हणाले. यावेळी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेची महिती देखील देण्यात आली. याप्रसंगी अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके, श्री प्रकाश शिंदे, श्री. शशिकांत सुतार, श्री. रमेश कांबळे, सौ. गौरी देशपांडे, सौ. सपना खाडे, किरण कांबळे, अर्जुन धनवडे, तसेच शिवराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, डॉ. मुंज, प्रा. विश्वजित कुराडे, बसवराज आजरी उपस्थितीत होते

Read More

डॉक्टर पतंगराव कदम कॉलेज किर्लोस्करवाडी

दि. 09 एप्रिल 2022

डॉक्टर पतंगराव कदम कॉलेज किर्लोस्करवाडी येथे विद्यार्थी पालक शेतकरी यांना जागतिक शेती व शेतीमाल बाजारपेठ या विषयावर मार्गदर्शन चेतन नरके यांनी केले. या कार्यक्रमासाठी मानसिंग बँकचे अध्यक्ष जे.के जाधव व शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते

Read More

अरुण नरके फौंडेशनची फौजदार(PSI) निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ

गुरुवार 31 मार्च 2022

वेळ : दुपारी 4 वा.

स्थळ : नरकेवाडी, अमृतधारा फार्म, कळंबा, कळंबा जेलजवळ, कोल्हापूर.

उपस्थिती : अध्यक्ष, विश्वस्त, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यार्थी प्रेक्षक

प्रस्तावना :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या(PSI) परीक्षेत अरुण नरके फौंडेशनचे तब्बल १६ विद्यार्थी यशस्वी झाले, यामध्ये दिपाली रविंद्र कांबळे अनुसूचीत जाती महिला प्रवर्गातून राज्यात पहिली तर धनश्री विठ्ठल तोरस्कर या ओबीसी स्पोर्ट्स प्रवर्गातून राज्यात पाचव्या आल्या त्याचबरोबर प्रियांका सुरेश माने(OBC F-11), अभिजित श्रीकांत घोरपडे(OBC G-13), सुशांत शंकर उपाध्ये(OBC G-16), शंभू आनंदराव पाटील (OPEN G-17),रणजीत आकारम कांबळे(SC G-25), रोहित बाळासो जाधव(SC G-31), सारीका नारायण मरकड (OPEN F-35), विशाल रंगराव गडकर(SC G-40), शितल राजाराम पाटील (OPEN F-45), रविकुमार शिवाजी पाटील(OPEN G-80),हैदर शौकत संदे(OPEN G-86), युवराज जगन्नाथ जगताप (OPEN G-87), प्रकाश शामराव सादळे(OPEN G-89), कुलदीप सुरेश पोवार(OPEN G-111) असे सर्वजण संस्थेचे विद्यार्थी राज्यातील पहिल्या १११ क्रमांकाचे आत उत्तीर्ण झाले आहेत.

            या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव 31 मार्च 2022 रोजी अमृतधारा फार्म, नरकेवाडी, कळंबा, कोल्हापूर येथे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. चेतन अरुण नरके (वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार) यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण नरके, विश्वस्त बाळ पाटणकर, रविंद्र उबेरॉय, अजय नरके, दिलीप नरके, खाजाणीस सौ स्निग्धा चेतन नरके, सौ लीना तुपे-नरके, सौ जयश्री नरके इत्यादी मान्यवर व  गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यार्थी प्रेक्षक उपस्थित होते.

       5 वा. कार्यक्रमाची सुरवात रोपाला पाणी घालून झाली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थाचा मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण नरके फौंडेशनचे पोलीस उपनिरीक्षकपदाच्या(PSI) परीक्षेत तब्बल १८ यशस्वी विद्यार्थी व 2 सेंटर PSI विद्यार्थ्यांचा गौरव गिफ्ट, शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प, फेटा देऊन करण्यात आला. तसेच मुलाखत कमिटी मधील API बनसोडे, API फाळके मॅडम, STI शशिकांत माने, फिजिकलचे सरदार सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  

            सर्व गुणवंत विद्यार्थ्यानी  यावेळी आपली मनोगते उस्पुर्तपणे व्यक्त केली. परीक्षेत यश मिळावे यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवलेच पण त्याचबरोबर अरुण नरके फौडेशनमुळे आम्हाला अभ्यासातील बारकावे समजले, तसेच वेगवेगळ्या तज्ञ अधिकारी यांच्या समवेत घेतलेल्या डिजिटल मुलाखत सरावाचा खूप फायदा झाला, आमच्या यशात आमच्या प्रयत्नाइतकेच अरुण नरके फौंडेशन येथील शिक्षक, स्टाफचाही तितकाच वाटा असल्याची प्रतिक्रिया यशस्वी विद्यार्थांनी दिली.

त्त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचा अध्यक्ष  मा. चेतन नरके म्हणाले  अशा प्रकारचे चित्र पूर्णपूणे बदलण्याची किमया करणारी पाउलवाट रूजवून घवघवीत यशाची परंपरा जोपासत करिअरच्या सर्वच क्षेत्रांत निकालामध्ये उत्तुंग शिखर सर करण्याचे काम अरुण नरके फौंडेशन गेली २७ वर्षे सातत्याने करीत आलेली आहे. संस्थेचे आजपर्यंत ४७५० हून अधिक विद्यार्थी शासकिय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत. हि यशाची परंपरा अशीच चालू राहील यात काही शंका नाही. यामध्ये बोलताना अरुण नरके फौंडेशन नवनवीन कोणकोणते कोर्सेस सुरु करत आहे त्याची माहित दिली त्याच प्रमाणे इच्छा असून हि पैशाआभावी ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांसाठी ५  लांखाची कै सुनिता नरके शिष्यवृत्ती योजनाची घोषणा करण्यात आली.

यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. व कार्यक्रमाची सांगता झाली.

सुत्रसंचलन शरद कांबळे सरानी व समारोप रमेश कांबळे यांनी केले.     

Read More