गुरुवार 31 मार्च 2022

वेळ : दुपारी 4 वा.

स्थळ : नरकेवाडी, अमृतधारा फार्म, कळंबा, कळंबा जेलजवळ, कोल्हापूर.

उपस्थिती : अध्यक्ष, विश्वस्त, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यार्थी प्रेक्षक

प्रस्तावना :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या(PSI) परीक्षेत अरुण नरके फौंडेशनचे तब्बल १६ विद्यार्थी यशस्वी झाले, यामध्ये दिपाली रविंद्र कांबळे अनुसूचीत जाती महिला प्रवर्गातून राज्यात पहिली तर धनश्री विठ्ठल तोरस्कर या ओबीसी स्पोर्ट्स प्रवर्गातून राज्यात पाचव्या आल्या त्याचबरोबर प्रियांका सुरेश माने(OBC F-11), अभिजित श्रीकांत घोरपडे(OBC G-13), सुशांत शंकर उपाध्ये(OBC G-16), शंभू आनंदराव पाटील (OPEN G-17),रणजीत आकारम कांबळे(SC G-25), रोहित बाळासो जाधव(SC G-31), सारीका नारायण मरकड (OPEN F-35), विशाल रंगराव गडकर(SC G-40), शितल राजाराम पाटील (OPEN F-45), रविकुमार शिवाजी पाटील(OPEN G-80),हैदर शौकत संदे(OPEN G-86), युवराज जगन्नाथ जगताप (OPEN G-87), प्रकाश शामराव सादळे(OPEN G-89), कुलदीप सुरेश पोवार(OPEN G-111) असे सर्वजण संस्थेचे विद्यार्थी राज्यातील पहिल्या १११ क्रमांकाचे आत उत्तीर्ण झाले आहेत.

            या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव 31 मार्च 2022 रोजी अमृतधारा फार्म, नरकेवाडी, कळंबा, कोल्हापूर येथे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. चेतन अरुण नरके (वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार) यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण नरके, विश्वस्त बाळ पाटणकर, रविंद्र उबेरॉय, अजय नरके, दिलीप नरके, खाजाणीस सौ स्निग्धा चेतन नरके, सौ लीना तुपे-नरके, सौ जयश्री नरके इत्यादी मान्यवर व  गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यार्थी प्रेक्षक उपस्थित होते.

       5 वा. कार्यक्रमाची सुरवात रोपाला पाणी घालून झाली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थाचा मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण नरके फौंडेशनचे पोलीस उपनिरीक्षकपदाच्या(PSI) परीक्षेत तब्बल १८ यशस्वी विद्यार्थी व 2 सेंटर PSI विद्यार्थ्यांचा गौरव गिफ्ट, शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प, फेटा देऊन करण्यात आला. तसेच मुलाखत कमिटी मधील API बनसोडे, API फाळके मॅडम, STI शशिकांत माने, फिजिकलचे सरदार सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  

            सर्व गुणवंत विद्यार्थ्यानी  यावेळी आपली मनोगते उस्पुर्तपणे व्यक्त केली. परीक्षेत यश मिळावे यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवलेच पण त्याचबरोबर अरुण नरके फौडेशनमुळे आम्हाला अभ्यासातील बारकावे समजले, तसेच वेगवेगळ्या तज्ञ अधिकारी यांच्या समवेत घेतलेल्या डिजिटल मुलाखत सरावाचा खूप फायदा झाला, आमच्या यशात आमच्या प्रयत्नाइतकेच अरुण नरके फौंडेशन येथील शिक्षक, स्टाफचाही तितकाच वाटा असल्याची प्रतिक्रिया यशस्वी विद्यार्थांनी दिली.

त्त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचा अध्यक्ष  मा. चेतन नरके म्हणाले  अशा प्रकारचे चित्र पूर्णपूणे बदलण्याची किमया करणारी पाउलवाट रूजवून घवघवीत यशाची परंपरा जोपासत करिअरच्या सर्वच क्षेत्रांत निकालामध्ये उत्तुंग शिखर सर करण्याचे काम अरुण नरके फौंडेशन गेली २७ वर्षे सातत्याने करीत आलेली आहे. संस्थेचे आजपर्यंत ४७५० हून अधिक विद्यार्थी शासकिय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत. हि यशाची परंपरा अशीच चालू राहील यात काही शंका नाही. यामध्ये बोलताना अरुण नरके फौंडेशन नवनवीन कोणकोणते कोर्सेस सुरु करत आहे त्याची माहित दिली त्याच प्रमाणे इच्छा असून हि पैशाआभावी ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांसाठी ५  लांखाची कै सुनिता नरके शिष्यवृत्ती योजनाची घोषणा करण्यात आली.

यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. व कार्यक्रमाची सांगता झाली.

सुत्रसंचलन शरद कांबळे सरानी व समारोप रमेश कांबळे यांनी केले.