पन्हाळा तालुक्यातील महिला बचत गटांना व्यवसायातील नवनवीन संधी विषयक मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अरुण नरके फाऊंडेशन आणि युथ बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पडळ फाटा येथील श्री कृष्ण हॉल येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सेवा क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या व्यवसायिक संधींचा लाभ घ्यावा – चेतन नरके

पन्हाळा तालुक्यातील महिला बचत गटांना व्यवसायातील नवनवीन संधी विषयक मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अरुण नरके फाऊंडेशन आणि युथ बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पडळ फाटा येथील श्री कृष्ण हॉल येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युथ बँक आणि गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन अरुण नरके यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात त्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी बचतगटातील जवळपास अडीचशे भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.