गोकुळचे नुतून संचालक तसेच थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार मा.चेतन अरुण नरके साहेब यांनी शाहूवाडी तालुक्यातील गोगवे चिलिंग सेंटर (गोकूळ) ला भेट दिली या वेळी सर्व कर्मचारी,अधिकारी यांच्याशी चर्चा व संवाद साधला.
कोल्हापूर (प्रतिनिधी):थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन अरुण नरके यांनी धामणी खोऱ्यातील महापूर बाधित झालेल्या कळे, पुनाळ, माजनाळ, हंबर्डे, हरपवडे आणि निवाचीवाडी या गावांचा दौरा केला. पूरग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरके सांगितले. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाहुवाडी पन्हाळाचे प्रांत माळी, तहसीलदार शेंडगे तसेच कृषी अधिकारी धायगुडे उपस्थित होते.
महापुराचे पाणी गावात शिरल्यामुळे घरे आणि दुकाने आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तसेच पिके देखील वाहून गेली आहेत. झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी लोकांना धीर दिला. उपाययोजनांसाठी योग्य त्या सूचना दिल्या. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याविषयी नागरिकांना आवाहन केले तसेच पशुधनाचे आरोग्य आणि इतर रोजगार विषयक बाबींचा आढावा घेतला.
लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येणाऱ्या काळात महापुरासारख्या संभाव्य आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संचालक नरके सांगितले.
अरुण नरके फौंडेशन सामाजिक क्षेत्रातील तब्बल २६ वर्षांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत आली आहे. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून संस्थेचे अध्यक्ष मा . चेतन अरुण नरके यांनी TV 9 देवदूत सन्मान २०२१ या संकल्पनेला पाठींबा देत सहभाग घेतला व संस्थेच्या विश्वस्त मा. सौ. स्निग्धा चेतन नरके यांचेही मार्गदर्शन यामध्ये लाभले.
रविवार दि १५ ऑगस्ट २०२१ दुपारी ४ वा. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाजवून असामान्य कर्तुत्व गाजवणाऱ्या देवदुतांचा सन्मान करण्यात आला. TV 9 मराठी च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अरुण नरके फाउंडेशन आणि परिवार अभिमानाने सहभागी झाला होता.
या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सहकार राज्य मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या दिपाली सय्यद, थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार , अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक मा. चेतन अरुण नरके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत TV 9 चे मॅँनेजिंग एडिटर उमेश कुमावत, व बिझनेस हेड भूषण खोत याचे हस्ते करण्यात आले.
TV 9 मराठी चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत बोलताना म्हणाले कि, देवदूत सन्मान गौरव सोहळ्याची संकल्पना सांगताच समाजातील काही दानशूर कार्यक्रमाचा भाग होण्यास पुढे आले यामध्येच एक अरुण नरके फौंडेशन कोल्हापूर, हा कार्यक्रम लवकरात लवकर करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. तसेच देवदूत सन्मान
कशासाठी आयोजित केला याची माहिती विशद केली. हा कार्यक्रम कोल्हापूरच घेण्यामागचा हेतूही विषद केला.
मुख्य सन्मानाच्या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवराच्या हस्ते अतिशय दिमाखात झाली यामध्ये प्रत्येक देवदूताचे कार्य व्हीडीओच्या माध्यमातून पाहता व ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहरे येत होते. कोणत्या परिस्थित त्यांनी हे कार्य केले याची कल्पना येत होती.
प्रत्येक देवदूताचा सन्मान हा त्याचे धाडस पाहून खास वाटत होता.
देवदूतांची यादी सोबत जडली आहे. स्मारोपामध्ये जे मान्यवर उपस्थित राहिले त्याचे आभार मानण्यात आले तसेच असे असंख्य देवदूत आहेत पण कोरोनामुळे प्राथनिधिक स्वरुपात आपल्याला देवदुतांचा सन्मान करावा लागला याचीही दिलगिरी TV 9 च्या वतीने मानण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.