अरुण नरके फौंडेशनने सामाजिक, शैक्षणिक, संशोधन, कला, सहकार इत्यादी क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद, सल्ले घेत नव सृजनात्मकतेला गती देऊन नव्याचा स्वीकार व जुन्याचा आदर बाळगत नवनवीन उपक्रम संस्था राबवित आहे. याच धर्तीवर मा. श्री. चेतन अरुण नरके यांच्या वाढ दिवसानिमित्त सप्टेंबर महिन्याच्या पहिला आठवडयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये अरुण नरके फौंडेशनच्या क्रीडा विभागांतर्गत आयोजित आजी-माजी फुटबॉलपटूच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या स्नेह सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक 6 सप्टेंबर 2021 रोजी शिवाजी पेठ संध्यामठ परिसरातील सभागृहात झाले.
अरुण नरके फौंडेशन आयोजित आजी-माजी फुटबॉलपटूच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी मा. श्री अरुण नरके, श्री. माणिक मंडलिक, मा. श्री चेतन अरून नरके , श्री. उदय आतकीरे, श्री.बाळासाहेब नीचिते, श्री. दिलीप माने, श्री. दत्तात्रय मंडलिक, शिवतेज खराडे, अभिजित वानिरे, विजय शिंदे, सुहास साळोखे, सुदेश मगदूम, प्रकाश रेडेकर, अकबर मकानदार, भाऊ घोडके, मनोज जाधव, सतीश चौगुले, आदींसह ज्येष्ठ माजी- आजी खेळाडू उपस्थित होते
संपूर्ण सभागृहात कोल्हापूरातील विविध पेठांमधील तालीम, संस्थांच्या फुटबॉलपटूचे टी-शर्ट व त्यांचे ध्वज लावण्यात आले होते. याच बरोबर कोल्हापूरची गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत हिचा नुकताच झालेला टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेतील टी-शर्ट व 19 वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झालेला विश्व शिंदे याचा टी-शर्ट ही मध्यभागी लावण्यात आला होता. ऑलम्पिकवीर पै. दिनकर शिंदे यांचे पणतू असणारे फुटबॉलपटू विश्व शिंदे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
आजी माजी फुटबॉलपटू याच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने निधन झालेल्या फुटबॉलपटूंना दीपप्रज्वलन करून श्रद्धांजली ही यावेळी वाहण्यात आली
के एस ए चे उपाध्यक्ष मा. श्री. अरुण नरके यांनी फुटबॉलमय वातावरण जपण्यासाठी असे उपक्रम पेठापेठांत सातत्याने व्हावे असे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ खेळाडूंच्या गुडघ्यावरील व्याधींवर उपचारावर नरके फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची घोषणाही केली
वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार, चेअरमन युथ को-ऑपरेटिव बँक लि., संचालक गोकुळ दूध संघ व अध्यक्ष अरुण नरके फौंडेशन मा. श्री चेतन अरुण नरके यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये उपस्थित आजी-माजी फुटबॉलपटूंना प्रोत्साहित केला तसेच अरुण नरके फौंडेशन च्या सहायाने भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही दिले
स्नेह मेळाव्यास आजी माजी फुटबॉलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संयोजक दिलीप माने यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद यादव यानी तर संयोजन सतीश सूर्यवंशी, विजय माने, पप्पू सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी केले. अरुण नरके फौंडेशन च्या सहकार्याने हा मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. असे उद्गार उपस्थितांनी काढले.