युथ बँकेच्या वतीने बाजारपेठेत निर्जंतुकीकरण मोहीम
युथ डेव्हलपमेंट बँकेच्या वतीने आणि अरुण नरके फौंडेशन तसेच कोल्हापूर व्यापारी आघाडीच्या सहकार्याने सामजिक बांधिलकीतून शाहुपुरी आणि लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील पूरग्रस्त दुकानांची निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
महापुराचे पाणी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी घुसल्यामुळे स्थानिक नागरिकांसोबत बाजारपेठेतील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी दुकानात शिरून दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखल, घाण तसेच दुर्गंधी पसरली आहे. सर्व व्यापारीवर्ग व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यासाठी दुकाने आणि व्यापारी संस्थांची स्वच्छता करत आहे. यावेळी स्वच्छता पूर्ण झालेली दुकाने आणि बाहेरच्या परिसरात औषध फवारणी तसेच ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी रिलायन्स मॉलच्या दारातून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रघुनाथ सूर्यवंशी, अधिकारी आनंदराव माने, अभिजीत भोईटे, कुलदीप कुंभार, यांच्यासह कोल्हापूर व्यापारी आघाडीचे संतोष उर्फ आप्पा लाड, सुधीर खराडे, धनंजय शिंदे, संजय चराटे, समाधान काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बँकेचे संचालक चेतन नरके यांच्या मार्गदर्शनाखाली महापुराने बाधित झालेल्या शाहुपुरी आणि लक्ष्मीपुरी मधील सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवणार असल्याचे बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. निर्जंतुकीकरणामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्यास प्रतिबंध होत असल्याने अशा प्रकारच्या औषध फवारणीची गरज असते. योग्य वेळी बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.सुभाष देसाई
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.सुभाष देसाई आणि थायलंड सरकारचे उपपंतप्रधानाचे आर्थिक आणि वाणिज्य सल्लागार गोकुळचे संचालक मा. चेतन अरुण नरके यांच्यात विविध उद्योग या विषयांवर चर्चा…