अरुण नरके फौंडेशनमार्फत बाजारभोगाव येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु

बुधवार दि. 06 एप्रिल 2022      वेळ :-  सकाळी 10.00 वा.

स्थळ :- शेतकरी संकुल, बसस्थानकासमोर, बाजारभोगाव, कोल्हापूर.

उपस्थिती :- गोकुळ चे मा. चेअरमन आदरणीय अरुण नरके , गोकुळ संचालक श्री चेतन नरके, मा. संचालक श्री विश्वासराव जाधव, युथ बँक संचालक श्री दगडू टोपकार, सरपंच माया नितीन पाटील, डॉ. नाना पाटील, श्री. दादा पाटील, श्री. जयसिंग हिर्डेकर, श्री. प्रकाश मोरे, तसेच पन्हाळा तालुक्यातील मान्यवर इ.     

         अरुण नरके फौंडेशन ग्रामीणभागातील प्रत्येक हाताला काम हा संकल्प घेऊन तरुण बेरोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु करत आहे. या माधमातून उच्चशिक्षित अथवा अल्पशिक्षित  तरुण किवा तरुणीमधील सृजनशीलता आणि कौशल्याला वाव देणारा रोजगार मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी महाराष्ट्रासह  शेजारी राज्यातील विविध उधोग आणि व्यापारी संस्थांसोबत संस्थेने करार केला आहे. उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरूण तरूणींना त्यासंबंधी सर्व प्रकारचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचसोबत व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, मुलाखत तंत्र असे आणि इतर रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणारे शिक्षण आणि प्रशिक्षण देखील याठिकाणी मिळणार आहे.

Read More

चेतन नरके उडान-डेअर टू ड्रीम पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी):  गोकुळचे संचालक चेतन नरके यांना झी मिडियाच्या उडान-डेअर टू ड्रीम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चेतन नरके यांचे ३५ ए च्या निर्बंधामधून युथ बँक बाहेर येण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, गोकुळ संचालक म्हणून जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न, ग्रामीण भागातील सहकारातील संस्थांची वाढ आणि विकासाकरिताचा त्यांचा सहभाग आणि परदेशातील कॉर्पोरेट कंपन्यांमधील अनुभवाचा सहकार वाढीसाठी सुरु केलेला वापर याविषयावरील एक फिल्म यावेळी दाखवण्यात आली. यावेळी आयोजित परिसंवादात चेतन नरके यांनी भविष्यकाळात सहकार क्षेत्रातील संधी आणि अपेक्षित बदल यावर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी ना.अशोक चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेते अरुण नलावडे, अभिनेत्री श्रेया बुगडे, झी २४ तास चे संपादक निलेश खरे, कंट्री हेड मिनी हॅरीसन, झी मिडिया कोर्पोरेशन चे अधिकारी, पत्रकार, तसेच कृषी, सहकार, बँकिंग, उद्योग, बांधकाम, सामाजिक यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुढील आठवड्यात या संपूर्ण कार्यक्रमाचे झी २४ तास या वृत्त वाहिनीवरून प्रसारण होणार आहे.

Read More