आजी-माजी फुटबॉलपटू स्नेह मेळावा

अरुण नरके फौंडेशनने सामाजिक, शैक्षणिक, संशोधन, कला, सहकार इत्यादी क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.  थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद, सल्ले घेत नव सृजनात्मकतेला गती देऊन नव्याचा स्वीकार व जुन्याचा आदर बाळगत नवनवीन उपक्रम संस्था राबवित आहे. याच धर्तीवर मा. श्री. चेतन अरुण नरके यांच्या वाढ दिवसानिमित्त सप्टेंबर महिन्याच्या पहिला आठवडयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये अरुण नरके फौंडेशनच्या क्रीडा विभागांतर्गत आयोजित आजी-माजी फुटबॉलपटूच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन                  करण्यात आले.

या स्नेह सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक 6 सप्टेंबर 2021 रोजी शिवाजी पेठ संध्यामठ परिसरातील सभागृहात झाले. 

अरुण नरके फौंडेशन आयोजित आजी-माजी फुटबॉलपटूच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी  मा. श्री अरुण नरके, श्री. माणिक मंडलिक, मा. श्री चेतन अरून नरके , श्री. उदय आतकीरे, श्री.बाळासाहेब  नीचिते, श्री. दिलीप माने, श्री. दत्तात्रय मंडलिक, शिवतेज खराडे, अभिजित वानिरे, विजय शिंदे, सुहास साळोखे, सुदेश मगदूम, प्रकाश रेडेकर, अकबर मकानदार, भाऊ घोडके, मनोज जाधव, सतीश चौगुले,  आदींसह ज्येष्ठ माजी- आजी खेळाडू                        उपस्थित होते

संपूर्ण सभागृहात कोल्हापूरातील विविध पेठांमधील तालीम, संस्थांच्या फुटबॉलपटूचे टी-शर्ट व त्यांचे ध्वज लावण्यात आले होते. याच बरोबर कोल्हापूरची गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत हिचा नुकताच झालेला टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेतील टी-शर्ट व 19 वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झालेला विश्व शिंदे याचा टी-शर्ट ही मध्यभागी लावण्यात आला होता. ऑलम्पिकवीर पै. दिनकर शिंदे यांचे पणतू असणारे फुटबॉलपटू विश्व शिंदे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

आजी माजी फुटबॉलपटू याच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने निधन झालेल्या फुटबॉलपटूंना दीपप्रज्वलन करून श्रद्धांजली ही यावेळी वाहण्यात आली

के एस ए चे उपाध्यक्ष मा. श्री. अरुण नरके यांनी फुटबॉलमय  वातावरण जपण्यासाठी असे उपक्रम पेठापेठांत सातत्याने व्हावे असे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ खेळाडूंच्या गुडघ्यावरील व्याधींवर उपचारावर नरके फौंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची घोषणाही केली

वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार, चेअरमन युथ को-ऑपरेटिव बँक लि., संचालक गोकुळ दूध संघ व अध्यक्ष अरुण नरके फौंडेशन मा. श्री चेतन अरुण नरके यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये उपस्थित आजी-माजी फुटबॉलपटूंना  प्रोत्साहित केला तसेच अरुण नरके फौंडेशन च्या सहायाने भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही दिले

स्नेह मेळाव्यास आजी माजी फुटबॉलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  स्वागत व प्रास्ताविक संयोजक दिलीप माने यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद यादव यानी तर संयोजन सतीश सूर्यवंशी, विजय माने, पप्पू सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी केले. अरुण नरके  फौंडेशन च्या सहकार्याने हा मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. असे उद्गार उपस्थितांनी काढले.

Read More

राजे विक्रमसिंह घाटगे कॉ-ऑप. बँक लि. कागल तर्फे सत्कार

राजे विक्रमसिंह घाटगे कॉ-ऑप. बँक लि. कागल तर्फे आज कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी बँकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मा. समरजीत घाटगे साहेब यांनी गोकुळचे संचालक मा. चेतन अरुण नरके साहेब यांचा युथ बँक 35 अ मधून बाहेर काढून ती पुन्हा उर्जित आवस्थेत आणली या बद्दल सत्कार करण्यात आला…

Read More

गोगवे चिलिंग सेंटर (गोकूळ)

गोकुळचे नुतून संचालक तसेच थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार मा.चेतन अरुण नरके साहेब यांनी शाहूवाडी तालुक्यातील गोगवे चिलिंग सेंटर (गोकूळ) ला भेट दिली या वेळी सर्व कर्मचारी,अधिकारी यांच्याशी चर्चा व संवाद साधला.

सोबत शाखा प्रमुख सुधाकर पाटील साहेब.

Read More
kolhapur flood

धामणी खोऱ्यातील पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार

कोल्हापूर (प्रतिनिधी):थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन अरुण नरके यांनी धामणी खोऱ्यातील महापूर बाधित झालेल्या कळे, पुनाळ, माजनाळ, हंबर्डे, हरपवडे आणि निवाचीवाडी या गावांचा दौरा केला. पूरग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरके सांगितले.
यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाहुवाडी पन्हाळाचे प्रांत माळी, तहसीलदार शेंडगे तसेच कृषी अधिकारी धायगुडे उपस्थित होते.

महापुराचे पाणी गावात शिरल्यामुळे घरे आणि दुकाने आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तसेच पिके देखील वाहून गेली आहेत. झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी लोकांना धीर दिला. उपाययोजनांसाठी योग्य त्या सूचना दिल्या. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून योग्य ती काळजी घेण्याविषयी नागरिकांना आवाहन केले तसेच पशुधनाचे आरोग्य आणि इतर रोजगार विषयक बाबींचा आढावा घेतला.

लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येणाऱ्या काळात महापुरासारख्या संभाव्य आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संचालक नरके सांगितले.

Read More

देवदूत सन्मान 2021 ( रविवार दि १५ ऑगस्ट २०२१)

अरुण नरके फौंडेशन  सामाजिक क्षेत्रातील तब्बल २६ वर्षांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत आली आहे. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून  संस्थेचे अध्यक्ष  मा . चेतन अरुण नरके यांनी TV 9  देवदूत सन्मान २०२१ या संकल्पनेला पाठींबा देत सहभाग घेतला व संस्थेच्या विश्वस्त मा. सौ. स्निग्धा चेतन नरके यांचेही  मार्गदर्शन यामध्ये लाभले.

रविवार दि १५ ऑगस्ट २०२१ दुपारी ४ वा. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाजवून असामान्य कर्तुत्व गाजवणाऱ्या देवदुतांचा सन्मान करण्यात आला. TV 9 मराठी च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अरुण नरके फाउंडेशन आणि परिवार अभिमानाने सहभागी झाला होता.

    या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सहकार राज्य मंत्री बाळासाहेब पाटील,  उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या  दिपाली सय्यद, थायलंड  सरकारचे वाणिज्य सल्लागार , अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक  मा.  चेतन अरुण नरके  आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत TV 9 चे मॅँनेजिंग एडिटर उमेश कुमावत, व बिझनेस हेड भूषण खोत याचे हस्ते करण्यात आले.

    TV 9 मराठी चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत बोलताना म्हणाले कि, देवदूत सन्मान गौरव सोहळ्याची संकल्पना सांगताच समाजातील काही दानशूर कार्यक्रमाचा भाग होण्यास पुढे आले यामध्येच एक अरुण नरके फौंडेशन कोल्हापूर, हा कार्यक्रम लवकरात लवकर करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. तसेच देवदूत सन्मान

कशासाठी आयोजित केला याची माहिती विशद केली. हा कार्यक्रम कोल्हापूरच घेण्यामागचा हेतूही विषद केला.

    मुख्य सन्मानाच्या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवराच्या हस्ते अतिशय दिमाखात झाली यामध्ये प्रत्येक देवदूताचे कार्य व्हीडीओच्या माध्यमातून पाहता व ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहरे येत होते. कोणत्या परिस्थित त्यांनी हे कार्य केले याची कल्पना येत होती.

प्रत्येक देवदूताचा सन्मान हा त्याचे धाडस पाहून खास वाटत होता.

देवदूतांची यादी सोबत जडली आहे. स्मारोपामध्ये  जे मान्यवर उपस्थित राहिले त्याचे आभार मानण्यात आले तसेच असे असंख्य देवदूत आहेत पण कोरोनामुळे प्राथनिधिक स्वरुपात आपल्याला देवदुतांचा सन्मान करावा लागला याचीही दिलगिरी TV 9 च्या वतीने मानण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Read More

युथ बँकेच्या वतीने बाजारपेठेत निर्जंतुकीकरण मोहीम

युथ डेव्हलपमेंट बँकेच्या वतीने आणि अरुण नरके फौंडेशन तसेच कोल्हापूर व्यापारी आघाडीच्या सहकार्याने सामजिक बांधिलकीतून शाहुपुरी आणि लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील पूरग्रस्त दुकानांची निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

महापुराचे पाणी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी घुसल्यामुळे स्थानिक नागरिकांसोबत बाजारपेठेतील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी दुकानात शिरून दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखल, घाण तसेच दुर्गंधी पसरली आहे. सर्व व्यापारीवर्ग व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यासाठी दुकाने आणि व्यापारी संस्थांची स्वच्छता करत आहे. यावेळी स्वच्छता पूर्ण झालेली दुकाने आणि बाहेरच्या परिसरात औषध फवारणी तसेच ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी रिलायन्स मॉलच्या दारातून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रघुनाथ सूर्यवंशी, अधिकारी आनंदराव माने, अभिजीत भोईटे, कुलदीप कुंभार, यांच्यासह कोल्हापूर व्यापारी आघाडीचे संतोष उर्फ आप्पा लाड, सुधीर खराडे, धनंजय शिंदे, संजय चराटे, समाधान काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बँकेचे संचालक चेतन नरके यांच्या मार्गदर्शनाखाली महापुराने बाधित झालेल्या शाहुपुरी आणि लक्ष्मीपुरी मधील सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवणार असल्याचे बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. निर्जंतुकीकरणामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्यास प्रतिबंध होत असल्याने अशा प्रकारच्या औषध फवारणीची गरज असते. योग्य वेळी बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे.

Read More

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.सुभाष देसाई

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.सुभाष देसाई आणि थायलंड सरकारचे उपपंतप्रधानाचे आर्थिक आणि वाणिज्य सल्लागार गोकुळचे संचालक मा. चेतन अरुण नरके यांच्यात विविध उद्योग या विषयांवर चर्चा…

Read More