अरुण नरके फौंडेशन आयोजित

संस्थापिका विश्वस्त कै. सौ. सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतीदिन

दिनांक :-  02 मार्च 2022

वार     :-  बुधवार

स्थळ  :-  श्री. शाहू  स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर.

उपस्थिती  :-  अध्यक्ष मा. श्री. चेतन नरके, संस्थापक मा. श्री. अरुण नरके, खाजाणीस सौ. स्निग्धा नरके, विश्वस्त श्री. अजय नरके, श्री. दिलीपनरके,  माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, विश्वस्त श्री. रविंद्र उबेरॉय,  गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, अमरसिंह पाटील, अजित नरके, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, युथ बँक अधिकारी –कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तावना :- अरुण नरके फौंडेशनच्या वतीने संस्थापिका कै. सौ. सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतीदिन निमित्य गेली 2 दशके देशभरातील नामवंत वक्त्यांची व्याख्यानाचे आयोजन  केले जाते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी माजी प्रधान सचिव महेश झगडे IAS यांचे ‘क्षितिजापार झेपावणाऱ्या पंखांना बळ देणारी प्रेरणा यशाची’  या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले गेले.

            कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी संस्थेचे संस्थापक मा. श्री. अरुण नरके, विश्वस्त मा. अजय नरके, मा. दिलीप नरके, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर व विश्वस्त रविंद्र उबेरॉय यांच्या हस्ते विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक :-अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. चेतन अरुण नरके यांनी संस्थेविषयी व नवीन कोर्सेसविषयी माहिती विशद केली तसेच शिक्षणाबरोबर संस्थेचा संस्था करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.   

            त्यानंतर प्रथम मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना व उद्योजकता विकास केंद्राचे माजी प्रमुख सुनील देसाई यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपला प्लन ब विषयी म्हणजेच सरकारी उद्योग व स्वयंरोजगार योजनेविषयी महत्वपूर्ण अशी सविस्तर माहिती दिली.

            यानंतर मेन वक्ते राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे IAS  यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री चेतन नरके याच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी  विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःला प्रेरणा हवी असेल तर दुसऱ्यांचे प्रेरणास्त्रोत बना, तरच स्पर्धा परीक्षा असो वा जीवन यात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन केले.   

स्पर्धा परीक्षा असो वा जीवन अपयशानंतर नैराश्य येऊ नये याकरता प्लन बी कायम तयार ठेवावा, असाही सल्ला त्यांनी दिला.

            झगडे म्हणाले, स्पर्धा परीक्षांचा टीआरपी शासनातील लोकांनी वर नेला आहे त्यामुळे पालकांच्या आशा वाढल्या आहेत. यात अपयश आले तर विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातो असे प्रतिपादन केले.

            कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिवर्षाप्रमाणे कोल्हापूरचे जेष्ठ गायक मा. श्री. महेश हिरेमठ यांचे पसायदान गायन झाले.

निवेदन व आभार श्री. स्वप्नील पन्हाळकर यांनी केले