दि. ०१ मे २०२२
उपस्थिती :- अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके, श्री प्रकाश शिंदे, श्री. शशिकांत सुतार, श्री. रमेश कांबळे, सौ. गौरी देशपांडे, सौ. सपना खाडे, किरण कांबळे, अर्जुन धनवडे, तसेच शिवराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, डॉ. मुंज, प्रा. विश्वजित कुराडे, बसवराज आजरी इत्यादी
अरुण नरके फौंडेशन व शिवराज विद्या संकुल यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सामजस्य करार झाला. यावेळी शिवराज विद्या संकुल व अरूण नरके फौंडेशनतर्फे सानेगुरूजी सेवकांच्या पतसंस्था इमारतीत सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन गोकुळ चे संचालक व फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. चेतन नरके यांच्या हस्ते झाले. ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षा माध्यमातून यश मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळावे म्हणून शिवराजने फौंडेशनशी करार करून स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरूवात केली आहे. यातून विद्यार्थ्यानी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करावे. असे अरूण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके म्हणाले. यावेळी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेची महिती देखील देण्यात आली. याप्रसंगी अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके, श्री प्रकाश शिंदे, श्री. शशिकांत सुतार, श्री. रमेश कांबळे, सौ. गौरी देशपांडे, सौ. सपना खाडे, किरण कांबळे, अर्जुन धनवडे, तसेच शिवराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, डॉ. मुंज, प्रा. विश्वजित कुराडे, बसवराज आजरी उपस्थितीत होते