पुण्यात टॉप थाय बॅण्ड ट्रेड फेअर २०२२ चे आयोजन-थायलंड मधील ३४ उद्योजक होणार सहभागी!

मुंबई : डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंड, आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स रॉयल थाय गव्हर्नमेंट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या सहकार्याने हडपसर पुणे येथील लक्ष्मी लॉन येथे २५ ते २७ मार्च २०२२ असे तीन दिवस टॉप थाय बॅण्ड ट्रेड फेअर २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. हेल्थ अॅण्ड ब्युटी, फूड अॅण्ड बेवरेज, फर्निचर आणि फॅशन या चार श्रेणीतील थायलंड मधील ३४ उद्योजक,उत्पादक , संस्था या मध्ये सहभागी होणार  असल्याची माहिती थायलंडच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरुण नरके यांनी दिली आहेत. या पत्रकार परिषदेत थायलंडच्या कॉन्स्लेट जनरल सुपात्रा आणि  महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.

दोन्ही देशांमधील उद्योजकांना संधी मिळणार :
याबाबत चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दाेन्ही देशातील व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे, दोन्ही देशातील उद्योजकांमध्ये व्यापारी करार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये दोन्ही देशामधील उद्योजकाना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यातून आर्थिक, बौद्धिक गुंतवणुकीसह रोजगार आणि उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. १९४७ मध्ये भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा थायलंड हा पहिला आशियाई देश होता. या दोन देशामधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दोन हजार  वर्षांहून अधिक जुने आहत धार्मिक आणि सांस्कृतिक समानतेमुळे मैत्रीचा पाया घट्ट होत सर्वच पातळीवरील संबंध खोलवर रुजले गेले आहेत.  
———————————————————-
व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत होतील-
    चीन आणि अमेरिकेचे बिघडलेले व्यापारी संबंध आणि जागतिक पातळीवरील राजकीय घडामोडीचा फायदा थायलंड आणि भारताच्या एकत्रित आर्थिक विकासासाठी संधी निर्माण करणारा आहे. या सर्वाचा विचार करता या ट्रेड फेअर च्या माध्यमातून दोन्ही देशातील स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर समान व्यासपीठ निर्माण होणार आहे. याकरिता लक्ष्मी लॉन येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या आयोजनासाठी लागणार सर्व खर्च डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंडच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रस्थापित व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास  चेतन अरुण नरके यांनी  व्यक्त केला आहे.
————————————————
 कोरोनातही द्विपक्षीय व्यापार वाढ-
   जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांकात यायलंड जगात सहावा आणि आशियात पहिला क्रमांक आहे. थायलंडच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात २१ टक्के वाटा हा पर्यटन क्षेत्राचा आहे. असे असले तरी थायलंड इतर अनेक उद्योगात अग्रेसर आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिक उपकरणे, कॉम्प्युटरचे सुटे भाग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, वाहने, वाहतूक व्यवसाय, चित्रपट आणि करमणूक, कलात्मक वस्तू असे अनेक उद्योग थायलंडच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालतात. भारत आणि थायलंड दरम्यान सध्यस्थितीत १२५ बिलियन डॉलर चा व्यवसाय होत आहे. भविष्यात या मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. कोरोना  महामारीत आणि आर्थिक मंदीतही थायलंड आणि भारत या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात ५६ टक्के  द्विपक्षीय व्यापार वाढ झाली आहे ही खूपच सकारात्मक बाब असल्याची माहिती  थायलंडच्या कॉन्स्लेट जनरल सुपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली

.

Read More

क्षितिजापार झेपावणाऱ्या पंखांना बळ देणारी प्रेरणा यशाची

अरुण नरके फौंडेशन आयोजित

संस्थापिका विश्वस्त कै. सौ. सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतीदिन

दिनांक :-  02 मार्च 2022

वार     :-  बुधवार

स्थळ  :-  श्री. शाहू  स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर.

उपस्थिती  :-  अध्यक्ष मा. श्री. चेतन नरके, संस्थापक मा. श्री. अरुण नरके, खाजाणीस सौ. स्निग्धा नरके, विश्वस्त श्री. अजय नरके, श्री. दिलीपनरके,  माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, विश्वस्त श्री. रविंद्र उबेरॉय,  गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, अमरसिंह पाटील, अजित नरके, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, युथ बँक अधिकारी –कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तावना :- अरुण नरके फौंडेशनच्या वतीने संस्थापिका कै. सौ. सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतीदिन निमित्य गेली 2 दशके देशभरातील नामवंत वक्त्यांची व्याख्यानाचे आयोजन  केले जाते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी माजी प्रधान सचिव महेश झगडे IAS यांचे ‘क्षितिजापार झेपावणाऱ्या पंखांना बळ देणारी प्रेरणा यशाची’  या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले गेले.

            कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी संस्थेचे संस्थापक मा. श्री. अरुण नरके, विश्वस्त मा. अजय नरके, मा. दिलीप नरके, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर व विश्वस्त रविंद्र उबेरॉय यांच्या हस्ते विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक :-अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. चेतन अरुण नरके यांनी संस्थेविषयी व नवीन कोर्सेसविषयी माहिती विशद केली तसेच शिक्षणाबरोबर संस्थेचा संस्था करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.   

            त्यानंतर प्रथम मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना व उद्योजकता विकास केंद्राचे माजी प्रमुख सुनील देसाई यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपला प्लन ब विषयी म्हणजेच सरकारी उद्योग व स्वयंरोजगार योजनेविषयी महत्वपूर्ण अशी सविस्तर माहिती दिली.

            यानंतर मेन वक्ते राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे IAS  यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री चेतन नरके याच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी  विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःला प्रेरणा हवी असेल तर दुसऱ्यांचे प्रेरणास्त्रोत बना, तरच स्पर्धा परीक्षा असो वा जीवन यात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन केले.   

स्पर्धा परीक्षा असो वा जीवन अपयशानंतर नैराश्य येऊ नये याकरता प्लन बी कायम तयार ठेवावा, असाही सल्ला त्यांनी दिला.

            झगडे म्हणाले, स्पर्धा परीक्षांचा टीआरपी शासनातील लोकांनी वर नेला आहे त्यामुळे पालकांच्या आशा वाढल्या आहेत. यात अपयश आले तर विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातो असे प्रतिपादन केले.

            कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिवर्षाप्रमाणे कोल्हापूरचे जेष्ठ गायक मा. श्री. महेश हिरेमठ यांचे पसायदान गायन झाले.

निवेदन व आभार श्री. स्वप्नील पन्हाळकर यांनी केले   

Read More

अरुण नरके फौंडेशन शिवाजी पेठ शाखेत शिवजयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष मा. चेतन नरके सर विद्यार्थांना मार्गदर्शन करताना

ओजस स्टडी हब येथे माननीय चेतन साहेब यांच्या हस्ते महाराजांची पूजा करण्यात आली

अरुण नरके फौंडेशनच्या सर्व शाखांमध्ये शिवजयंती विद्यार्थी सहभागातून उत्साहात साजरी झाली, यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चेतन अरुण नरके साहेब त्यांनी विद्यार्थ्याना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

Read More

अरुण नरके फौंडेशनचे विद्यार्थी CRPF- Sub Inspector पदी निवड झालेले प्रसाद जाधव व प्रथमेश तोडकर या दोघांचा सत्कार

अरुण नरके फौंडेशनचे विद्यार्थी CRPF- Sub Inspector पदी निवड झालेले प्रसाद जाधव व प्रथमेश तोडकर या दोघांचा सत्कार फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री चेतन नरके साहेब यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी अध्यक्ष श्री चेतन नरके साहेबांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या अभिनंदनाबरोबरच सर्व विद्यार्थ्याना मार्गदर्शनही  केले.   

Read More

नृत्यसंगम 2021 ऑनलाईन नृत्यस्पर्धा

अरुण नरके फौंडेशनचा सामाजिक क्षेत्रातील तब्बल २६ वर्षांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत संस्थेचे अध्यक्ष मा . चेतन अरुण नरके साहेब यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सांस्कृतिक विभागांतर्गत, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ पुन्हा नव्याने सुरू व्हावी यासाठी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन आणि अरूण नरके फौंडेशन यांच्या सहकार्याने कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी परिसरातील नृत्यकलाकार, नृत्यदिग्दर्शक कलाकारांकडून नवनिर्मिती सादर व्हावी, गरजु कलाकारांना मदत निधी व समाजकार्यास हातभार लागावा या उद्देशाने नृत्यसंगम २०२१ या ऑनलाईन नृत्यस्पर्धेचे चे आयोजन केले होते.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. चेतन नरके, संस्थापक श्री. अरुण नरके, विश्वस्त सौ स्निग्ध नरके, सौ जयश्री नरके, अरुण नरके फौंडेशनचे कला विभागप्रमुख श्री सागर भालकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.   

या नृत्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यातील निवडक काही क्षणचित्रे….

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

आदित्य एज्युकेशन सोसायटी संचलित, आदित्य विद्यानिकेतन मधील विविध राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व आदित्य लिट्ल चॅम्प या  प्रायमरी स्कूलचा उदघाटन सोहळा गोकुळचे संचालक मा.श्री.चेतनजी नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

Read More

माले ग्रामपंचायत यांच्या मार्फत सत्कार समारंभ

माले – पन्हाळा : ३१ / १० / २०२१

गोकुळचे विध्यमान संचालक मा.श्री.चेतन अरुण नरके यांचा दुधसंस्था प्रतिनिधी तसेच माले ग्रामपंचायत यांच्या मार्फत सत्कार समारंभ संपन्न झाला

उपस्थित गोकुळचे मा.संचालक मा.श्री.विश्वासराव जाधव , सरपंच सौ .भारती पाटील , डे .सरपंच श्री.अरविंद चौगले , श्री.अजित पाटील संचालक मार्केट कमिटी ,श्री.उत्तम पाटील ग्रा. सदस्य , श्री.अमोल पाटील चेअरमन शुभलक्ष्मी दूध संस्था , श्री.कृष्णात पाटील  ग्रा.सदस्य , श्री. शिवाजी पाटील ग्रा . सदस्य , श्री.विजय पाटील , श्री.प्रवीण पाटील तसेच माले , बोरपाडळे , काटळे , मोहरे , केखले , जाखले  गावातील दुधसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

Read More

महानंद चे चेअरमन श्री रणजित देशमुख यांची भेट

महाराष्ट्रातील दूध संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद चे चेअरमन श्री रणजित देशमुख कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी श्री अरुण नरके साहेब यांची भेट घेण्यासाठी त्यांनी आमच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राज्यातील दुग्ध व्यवसायावर त्यामधील संधी आणि आव्हाने याबाबत साहेबांचे मार्गदर्शन घेतले. भविष्यकाळात महानंदच्या विकासासाठी तसेच राज्यातील डेअरी उद्योगा समोरील समस्या सोडवण्यासाठी आमची एकत्र काम करण्याच्या विषयावर चर्चा झाली.

Read More